बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी तालुका पंचायत सदस्य कृष्णा ना. हुंदरे (वय 70) रा. हंगरगा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 5 विवाहित मुली, एक मुलगा, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार रविवारी दुपारी 12 वाजता हंगरगा येथे होणार आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बुलंद आवाज हरपला अशी भावना कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे. तालुका समितीच्या अनेक सभा बैठका त्यांनी गाजवल्या होत्या. सीमा प्रश्नासाठी अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.