बेळगाव : सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात कारण शेतपिकातील उंदीर खाऊन साप शेतकऱ्याला एकप्रकारे मदतच करतो. मात्र आज मैत्रिदिनी एका शेतकऱ्याने नागसापाचे प्राण वाचवून खऱ्या अर्थाने मैत्रीचे नाते निभावले असे म्हणावे लागेल.
याबाबतची सविस्तर महिती अशी की, हंदिगनूर येथील शिवारात एक नाग साप विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. लागलीच त्या शेतकऱ्याने सर्पमित्र विनायक केसरकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्या सापाबद्दल माहिती दिली. साप विषारी असल्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. थोड्याच वेळात सर्पमित्र विनायक केसरकर व त्यांचे सहकारी राहुल गावकर घटनास्थळी पोचले व विहिरीत उतरून त्या सापाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मैत्रिदिनी नागपंचमीच्या काळात एका सापाला जीवदान देऊन शेतकऱ्यांनी एकप्रकारे आपली श्रद्धा दाखविली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta