
बेळगाव : रक्षाबंधनच्या निमित्ताने सहलीने मार्केट पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथे मार्केट पोलीस स्टेशनचे सीपीआय श्री. मंजुनाथ तुलसीगिरी व उपस्थित असलेले त्यांचे सहकारी यांना राखी बांधली. त्यानंतर प्राईड सहेलीने सांबरा विमानतळावर रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला. प्रथम सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा व नेत्रा शहा यांच्या हस्ते फित कापण्यात आली. त्यानंतर सांबरा विमानतळाची माहिती राजेश कुमार मौर्य यांनी दिली. तसेच सगळ्या स्टाफची ओळख करून दिली. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना सहलीने राखी बांधली. रक्षाबंधनाची भेट म्हणून प्राईड सहेलीच्या ग्रुपला एअरलाइन्सकडून हँडमेड वॉटर कलर पेंटिंग देण्यात आली. यावेळी रेड्डी, नियाज सर, नागेश सर, शर्मित सर, सुजन सर, राम सर, मिलिंद सर, महेंद्र साळवी सर हे वेगवेगळ्या एअरलाइन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
सहेलीच्या वतीने सचिव जिग्ना शहा, रश्मी पाटील, नेत्रा शहा, पवन राजपुरोहित, रूपा मंगावती, भक्ती कारेकर आणि सलमा मॅडम उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta