
येळ्ळूर : सालाबाद प्रमाणे यावर्षीही विजयादशमी निमित्त श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर शिओली (ता. खानापूर) येथील श्री हनुमान भजनी मंडळाचा भारुड भजनी कार्यक्रम बुधवार (ता. 5) रोजी रात्री 10-00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर हे असणार आहेत. याप्रसंगी श्री चांगळेश्वरी देवीचे पूजन यल्लाप्पा आप्पांण्णा पाटील (बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर) यांच्या हस्ते होईल. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हणमंत कूगजी (अभियंते व बिल्डर), अजित लक्ष्मण गोरल (उद्योजक), नारायण दत्तात्रय पाटील (उद्योजक), डी. जी. पाटील (चेअरमन नेताजी सोसायटी येळ्ळूर) हे असणार आहेत. तर शिवपूजन सिव्हिल इंजिनिअर विशाल टक्केकर, आनंद यल्लाप्पा गोरल, अनिल महादेव सांबरेकर, उत्तम यल्लाप्पा गोरल, कपिल मनोहर पाटील, कुशल विष्णू मासेकर, पराग पांडुरंग कानशिडे यांच्या हस्ते होणार आहे. तर दीप प्रज्वलन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उद्योजक सतीश शिवाजी पाटील, परशराम महादेव मंगणाईक, प्रा. सी. एम. गोरल, स्वामी विवेकानंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश विष्णू पाटील आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार आहे. तर प्रमुख वक्त्या म्हणून कुमारी वैष्णवी भरमाणा मंगणाईक ह्या असणार आहेत. त्याशिवाय प्रमुख पाहुण्याची उपस्थिती असणार आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त विजयादशमीच्या दिवशी गावातील महिला भगिनी दिवसभर उपवास करतात व रात्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये आरती धरतात. या महिलांची रात्र जागरण करण्याकरिता वरील भारुड भजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा गावातील सर्व नागरिकांनी, महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta