बेळगाव : बेळगांव ग्रामीण पोलिसानी सावगाव तालुका बेळगांव येथे घातली होती धाड. धाडीत 26 लिटर दारु किंमत रुपये 10,287/- व रोख 800 रु. आरोपीकडून जप्त करण्यात आले होते.
बेळगांव ग्रामीण पोलिसात दाखल झालेल्या खटल्यानुसार फिर्यादी संगमेश शिवयोगी सि.पि. आय बेळगांव ग्रामीण पोलिस ठाणा यांच्या फिर्यादीवरून बेळगांव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. संगमेश शिवयोगी यांना दि. 09/10/2019 रोजी खात्रीदायक बातमी मिळाली त्याप्रकारे त्यांनी आपले पोलीस कर्मचारी घेऊन संध्याकाळी ठिक 7.00 वाजता सावगाव तालुका बेळगांव येथील रामदेव गल्ली येथे अचानक धाड टाकली त्यावेळी आरोपी महेश हा सार्वजनिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी दारु विकत होता त्यावेळी बेळगांव ग्रामीण पोलीसानी धाड टाकली व तिथेच त्याला पकडले व अंग झडती घेतले त्यावेळी त्यांनी आपले नांव महेश रामा बसरीकट्टी, वय : 45 वर्षे, राहणार : सावगाव असे सांगितले. आरोपी हा रामदेव गल्ली येथे सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी व सरकारकडून कोणतेही दारु विकण्याची पास व परमिट नसताना 3x रम चे दारूचे बॉटल टोटल 26 लिटर त्याची एकुण किंमत रुपये 10,287/- होते व 800 रुपये रोख आरोपीकडे सापडले. त्यामुळे पंचासमक्ष पंचनामा करुन फिर्याद दाखल करून आरोपीला अटक केली व न्यायालयात हजर केले.
बेळगांव येथील तसरे जे. एम. एफ. सी न्यायालयाने साक्षिदारातील विसंगतीमुळे सदर आरोपी. महेश रामा बसरीकट्टी याची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta