बेळगाव : बेळगावच्या आझमनगर येथील रस्त्यावरील विक्रेत्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास होऊ नये म्हणून बेळगाव महानगर पालिकेसमोर आंदोलन केले. यावेळी नगरसेवक व आयुक्तांच्या मध्यस्थीने त्यांचा प्रश्न सोडविण्यात आला.
बेळगावच्या आझम नगरमध्ये रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना त्रास देऊन मनपाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा भाजीपाला पळवून नेल्याच्या निषेधार्थ बेळगाव महापालिकेसमोर त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर नगरसेवक मुस्ताक मुल्ला व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आप्तस्वकीय व महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांनी मध्यस्थी करून प्रश्न सोडविला. गेल्या अनेक दिवसांपासून आझम शहरातील रस्त्याच्या कडेला भाजीविक्रीचा व्यवसाय करत आहोत. मात्र काही दिवसांपासून स्थानिकांना त्रास होत असल्याने त्यांनी आता तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तेथे व्यवसाय करणाऱ्या महिलांना शिवीगाळ करून भाजीपाल्याची नासधूस केली आहे. इतरत्र जागा दिली. पण तिथे कोणी येत नाही. आम्हाला मिळालेले व्यवसाय कर्ज कसे फेडायचे? असे भाजी विक्रेते संतोष लमाणी यांना विचारले.
Belgaum Varta Belgaum Varta