बेळगाव : बेळगावातील विविध संगीत संस्थांशी संबंधित असलेले संगीत प्रेमी डॉक्टर अशोक सखदेव यांना बेळगावातील कलाकारांच्यातर्फे स्वर श्रध्दांजली कार्यक्रमाच्याद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. रविवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत पंडित रामभाऊ विजापूरे स्वर मंदिर, बुधवार पेठ, टिळकवाडी येथे सदर स्वर श्रध्दांजली कार्यक्रम होणार आहे.
डॉ. अशोक सखदेव हे एक फॅमिली डॉक्टर म्हणून तर परिचित होतेच. शिवाय ते उत्तम बुद्धिबळपटू देखील होते. संगीताची देखील त्यांना आवड होती. केवळ कानसेन म्हणून नव्हे तर संगीताचे जाणकार म्हणून देखील ते परिचित होते. बेळगावात झालेली एकही मैफिल त्यांनी चुकवली नाही.पंडित रामभाऊ विजापूर रे, पंडित जोशिबुवा यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. आर्ट्स सर्कल आणि कलाकार संघाशी देखील त्यांचे जवळचे संबंध होते. सुनीता देशपांडे, पंडित श्रीधर कुलकर्णी यांचे स्वर श्रध्दांजली कार्यक्रमात गायन होणार आहे. पंडित सुधांशू कुलकर्णी यांचे संवादिनी वादन होणार आहे. संगीत प्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्यातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta