
बेळगाव : दिनकर रामचंद्र आळतेकर (एनकेज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड- एच ओडी अकाऊटंट) व कवयित्री सौ. अस्मिता आळतेकर यांची कन्या नेहा यांनी भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था (ICAI) आयोजित अंतिम परीक्षेत यश संपादन करून चार्टर्ड अकाउंटंट (CA) हा मानाचा दर्जा प्राप्त केला आहे.
त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि ध्येयवेड याचे हे यशस्वी फलित असून हा अभिमानाचा क्षण संपूर्ण आळतेकर कुटुंबासाठी गौरवाचा ठरला आहे.
त्यांना सीए विनयकुमार अलीअण्णावरमठ व सीए सतीश मेहता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्या बेळगाव येथील महिला विद्यालयच्या आदर्श विद्यार्थीनी असून बारावीला के एल ई ईंडिपेंडंट महाविद्यालयातून 2018 मध्ये पहिल्या आल्या.नंतर सीए साठी प्रयत्न केला. त्यांच्या या उज्ज्वल यशासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta