Tuesday , September 17 2024
Breaking News

संकेश्वर

कमतनूर-निडसोसी सेंटर येथे तिहेरी वाहन अपघातात एक ठार

  संकेश्वर (महंमद मोमीन) : कमतनूर-निडसोसी सेंटर येथे आज दुपारी ३ वाजता घडलेल्या तिहेरी वाहन अपघातात रस्ता मजूर जागीच ठार झाला आहे. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कमतनूर निडसोसी रस्ता येथे आज दुपारी विचित्र तिहेरी वाहन अपघात घडला आहे. आज दुपारी 3 वाजता बेळगांवहून चिकोडीकडे भरधाव वेगात निघालेल्या मालवाहू …

Read More »

हिरण्यकेशी नदीपात्रातील गोटूर बंधाऱ्यात मगरीचे दर्शन

  संकेश्वर : गोटूर बंधाऱ्याच्या पश्चिम दिशेस कर्नाटकच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीपात्रात संकेश्वर परिसरात सुमारे आठ फुटाहून अधिक लांबीची मगर फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी नांगनूर येथील शेतकरी रामचंद्र कोकितकर यांनी नदीकाठी मगर फिरताना प्रत्यक्ष पहिली आहे. सदर मगर केव्हाही नदीपात्राबाहेर येऊ शकते त्यामुळे शेतकरी वर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गेल्या वर्षभरापासून …

Read More »

संकेश्वरात पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला सहमती

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका सभेत संकेश्वरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. सभेला प्रदुर्षण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. रमेश, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, पालिकेचे एस. बी. तोडकर यांनी मार्गदर्शन केले. प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीला निर्बंध, …

Read More »

संकेश्वरात उन्ह पाऊस अन् विजांचा गडगडाट…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नागरिकांना आज विचित्र हवामानाचा अनुभव घेता आला. सकाळी पावसाच्या तुरळक सरी, दुपारी उन्हाच्या काहिलीने लोकांना परेशान केले अन् सायंकाळी विजांच्या कडकडाटातसह तुरळक पाऊस बरसला. आजच्या विचित्र हवामानाची लोकांत चांगलीच चर्चा केली जात आहे. तरण्या पावसानंतर पुष्य नक्षत्र काळात बरसणाऱ्या म्हातारा पावसाची एंट्री संथगतीने झालेली दिसत …

Read More »

संकेश्वर स्विमिंग ग्रुपतर्फे शिवअष्टोत्तर पूजा

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर स्विमिंग ग्रुपतर्फे ग्रामदैवत श्री शंकराचार्य मठात श्रावण मासारंभ निमित्त शिवअष्टोत्तर (शतकावली) पूजा आरंभ करण्यात आली आहे. शिवअष्टोत्तर पूजा पुरोहित वामन पुराणिक यांच्याकडून केली जात आहे. ते दररोज सकाळी ७ वाजता संपूर्ण श्रावणमासमध्ये शिव अष्टोत्तर पूजा करणार आहेत. त्यांनी स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांना शिवकालीन शिवअष्टोत्तर पूजेचे …

Read More »

मोटारसायकलवरून जाताना तीव्र हृदयघाताने अरुण नेसरी यांचे निधन

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सुभाष रस्ता येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण उर्फ भुट्टो दुंडप्पा नेसरी (वय ५५) यांचे आज सकाळी ११.३० वाजता तीव्र हृदयघाताने निधन झाले. सकाळपासून त्यांना थोडसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी डॉ. टी. एस. नेसरी यांच्याकडे आरोग्य तपासणी करुन घेतली होती. डाॅक्टरांनी त्यांना एसीजी तपासणीचा सल्ला दिला …

Read More »

संकेश्वरात चर्चेतील नामदेव महिला मंडळाचा माऊली नृत्याविष्कार

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकताच श्री नामदेव शिंपी दैवकी समाजातर्फे संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोहळ्यात सायंकाळी गांधी चौक येथे नामदेव महिला मंडळाने सादर केलेले शानदार नृत्य लोकांच्या पसंतीला उतरलेले दिसत आहे. सोशल मिडियावर नामदेव महिला मंडळाचे नृत्य चांगलेच गाजत …

Read More »

माझं “उत्तर” हुक्केरीतून लढत : ए. बी. पाटील

  संकेश्वर (महंमद मोमीन) : उत्तर -बित्तर कांहीं नाहीं. मी हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून लढत देणार असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते राज्यांचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्सव निमित्त आयोजित सभेला उद्देशून बोलत होते. सभेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्याला हुक्केरी आणि संकेश्वर घटक काॅंग्रेसचे हजारो कार्यकर्ते …

Read More »

दुऑ मे याद रखना….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : माजी खासदार रमेश कत्ती यांनी आज एका शाळेच्या कार्यक्रमात दुऑ मे याद रखना असे सांगत मुस्लिम समाज बांधवांकडू चक्कं मतयाचना केली आहे. आपल्या भाषणात रमेश कत्ती यांनी समाज बांधवांवर थेट निशाना साधला. ते म्हणाले, मुस्लिम समाजाने आजपावेतो सांगितलेली सर्व कामे मंत्री उमेश कत्तीं आणि आपण …

Read More »

अपघाताला आमंत्रण देतोय तवंदी घाट….

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : तवंदी घाट माथ्यावर छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच गोष्ट बनलेली दिसत आहे.पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरवेगात धावणारी वाहने अपघातग्रस्त होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तवंदी घाटात भरवेगात धावणाऱ्या वाहनांची गती कमी करुन अपघात टाळणे शक्य असल्याचे युवानेते विनोद संसुध्दी यांनी आमच्या प्रतिनिधीशी …

Read More »