Sunday , September 20 2026
Breaking News

आजरा

मुमेवाडीत विद्यार्थ्यांना ओळखपत्र, तिरंगा बॅच वाटप; दिंडी, दहीहंडी आणि स्वच्छता उपक्रम उत्साहात

  आजरा : मुमेवाडी (ता. आजरा) येथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना ओळखपत्र व तिरंगा बॅचचे वाटप करण्यात आले, तर वारकरी व ग्रामस्थांच्या सहभागातून दिंडी व दहीहंडी सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यासोबतच बळीराजा महिला शेतकरी गटाने स्वच्छता मोहीम राबवून …

Read More »

पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून मुमेवाडीतील महिला शेतकऱ्यांचा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार

  मुमेवाडी : दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध गावे घडविण्याच्या उद्देशाने अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाचा सकारात्मक परिणाम आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे दिसून येत आहे. येथील जय किसान महिला शेतकरी गटातील महिलांनी यंदा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार केला आहे. पाणी फाउंडेशनच्या टीमने मुमेवाडी …

Read More »

प्राथमिक विद्या मंदिर, मुमेवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  आजरा : मुमेवाडी येथील प्राथमिक विद्या मंदिर शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. रामदास मोरवाडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, भाषणे व विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कु. सिद्धी विकास …

Read More »

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

  नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या तिन्ही तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून माजी आमदार कै.तुकाराम कृष्णाजी कोलेकर यांच्या आशीर्वादाने विद्येचे माहेरघर समजले जाते, येथे आसपासच्या गावाबरोबरच सीमा भागातील कर्नाटकमधून दड्डी- कोट, बेळंकी, मोदगे येथील बरेचसे विद्यार्थी नेसरी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यांना नेसरी वाहतूक …

Read More »

मलिग्रे येथील तरुण डॉक्टरचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

  सांगली कोल्हापूर महामार्गावरील तावडे हॉटेल नजिक अपघात नेसरी (संजय धनके) : आजरा तालुक्यातील मलिग्रे गावचे प्रसाद उर्फ बाबू दिनकर बुगडे (वय 26) सध्या राहणार सांगली या तरुण डॉक्टरचा सांगली कोल्हापूर महामार्गावर तावडे हॉटेल नजिक आज शनिवार दि. 20 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान ट्रकच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. प्रसाद बुगडे …

Read More »

आजरा आगारात 17 डिसेंबर रोजी “प्रवासी राजा” दिनाचे आयोजन

  नेसरी (संजय धनके) : आजरा आगारात बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी “प्रवासी राजा” दिन व कामगार पालक दिन असा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असून या कार्यक्रमात प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या जातील, त्यावरील …

Read More »

युवकांना व्यसनातून मुक्त करणे काळाची गरज : माजी आमदार राजेश पाटील

  मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटन सोहळा संपन्न तालुक्यातील झालेला विकास सर्वसामान्य जनतेला माहिती असून युवकांना मात्र विकासाची माहिती न देता केवळ गुटखा, मटका व व्यसनाकडे वळविण्याचे सुरू आहे. त्यासाठी युवकांना व्यसनातून मुक्त करणे व तालुक्यातील झालेल्या विकास कामांची माहिती देणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील …

Read More »

मुमेवाडी येथे इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार!

  आजरा : मुमेवाडी ता. आजरा येथील ग्राम पंचायत मुमेवाडी, शाळा व्यवस्थापन समिती व श्री. भावेश्वरी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व सर्व पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. मनोहर दावणे सर हे …

Read More »

मलिग्रे येथे महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने केला विधवा महिलेचा सन्मान…

    आजरा : मलिग्रे ता. आजरा येथील अंगणवाडी व महिला बचत गटाच्या वतीने आयोजित महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने विधवा महिला शितल साईनाथ बुगडे, या सौभाग्य अलंकार व कुंकू याचा धाडसाने वापर करतात. यासाठी त्यांचा मलिग्रे सरपंच शारदा गुरव याच्या हस्ते विशेष सत्कार करणेत आला. विशेषतः ८ मार्चला शितल बुगडे …

Read More »

आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू

  आजरा : आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून ख्रिश्चन समाजातील दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी चार वाजता घडली. मयतामध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, फिलिप अंतोन कुतिन्हो हे आयटी इंजिनीयर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस होते. नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमले होते. आज …

Read More »