Sunday , September 20 2026
Breaking News

लाइफस्टाइल

गणेशोत्सवाची भव्यता वाढली; पण टिळकांचा विचार कुठे हरवला?

    राष्ट्रजागृतीसाठी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आज दिखाऊपणा, डीजे आणि खर्चाच्या स्पर्धेचे गालबोट; सामाजिक प्रबोधनाची मशाल पुन्हा पेटविण्याची गरज बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया…’च्या जयघोषाने शहरापासून गावखेड्यांपर्यंत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई, भव्य मूर्ती, देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप अधिकाधिक भव्य होत …

Read More »

विद्यार्थी रूपी रथाचे सारथी; शिक्षकांनीच उचलली शाळेची वाट

  विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांची रिक्षा वर्दी; महिन्याला दहा हजारांचा खर्च स्वतःच्या खिशातून – राधिका सांबरेकर यांजकडून  ‘गुरुविना कोण दाखवील वाट?’ असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो त्यांच्या स्वप्नांचा मार्गदर्शक, पालक आणि आधारवडही असतो. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम जसे कुंभार …

Read More »

दुर्गम धनगरवाड्याच्या ज्ञानज्योतीचा अखंड दीप

  १५ वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत बाबुराव सावंत सरांची ज्ञानसेवा; ग्रामस्थांच्या विश्वासावर शाळेची वाटचाल – राधिका सांबरेकर यांजकडून  बेळगाव : शहरापासून काही अंतरावर शिक्षणाच्या विविध सुविधा सहज उपलब्ध असताना, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आजही शाळेपर्यंत पोहोचणे आणि शिक्षणाची दारे खुली ठेवणे हे मोठे आव्हान आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत धनगरवाडा (धामणे-बैलूर) येथील सरकारी …

Read More »

शिक्षक दिन विशेष : शाळाच घर अन् मेंडिलकरच कुटुंब; १३ वर्षांपासून ज्ञानदानाची अविरत सेवा

  अतिथी शिक्षक नामदेव अनगोळकर यांची दुर्गम भागातील शिक्षणसेवा; गावकऱ्यांचे निस्वार्थ प्रेम हाच मोठा पुरस्कार -राधिका सांबरेकर यांजकडून  मेंडिल : खानापूर तालुक्यातील दुर्गम मेंडिल गावातील सरकारी प्राथमिक शाळेत गेल्या तब्बल १३ वर्षांपासून अतिथी शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणारे नामदेव अनगोळकर यांनी शिक्षणसेवेत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शाळेतील एका …

Read More »

शिक्षक दिन विशेष : गवाळी ज्ञानवाटेवरील ‘वटवृक्ष’!

  तीन नद्या, दोन साकव आणि ४० फुटांचा पूल पार करून २३ वर्षे ज्ञानदान; कुटुंबापासून दूर राहून शिक्षक शामराव जाधव यांची अविरत शिक्षणसेवा – राधिका सांबरेकर यांजकडून  बेळगाव : मातीच्या लहानशा गोळ्याला सुंदर आकार देणाऱ्या कुंभाराप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे शिक्षक, स्वतः प्रकाशमान राहून इतरांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे …

Read More »

श्रावणमास आला… भक्तीची पालखी घेऊन!

  हिरवाईच्या साजात नटलेला निसर्ग, मंदिरांत घुमणारा हर हर महादेवचा जयघोष अन् घराघरांत व्रत-वैकल्यांची मंगलमय लगबग “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे; क्षणात येते सरसर अन् फिरुनी क्षणात ऊन पडे…” बेळगाव : पावसाच्या रिमझिम सरींनी धरतीला चिंब भिजवित, हिरवाईची शाल पांघरून निसर्गाला नवसंजीवनी देणारा आणि मनामनांत भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत सहकारी बळवंतराव वराळे : समर्पण, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श

  भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे. काही जण आपल्या नेतृत्वामुळे इतिहासात अजरामर झाले, तर काहींनी प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजसेवेचा अखंड वसा जपला. अशाच समर्पित व्यक्तिमत्त्वांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत सहकारी बळवंतराव वराळे यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. २ फेब्रुवारी १९०२ …

Read More »

फ्रेंडशिप डे विशेष : वर्षातून एक दिवस फक्त मैत्रिणींसाठी; बेळगावच्या महिलांचा आदर्श

  बेळगाव (पत्रकार – राधिका सांबरेकर) : मैत्री… विश्वासाचा हात, आपुलकीची सावली आणि आयुष्यभर साथ देणारे निस्वार्थ नाते. रक्ताच्या नात्यांइतकीच घट्ट, पण कोणत्याही बंधनात न अडकलेली ही भावना प्रत्येकाच्या आयुष्याला नवा अर्थ देते. म्हणूनच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा फ्रेंडशिप डे हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून, आयुष्य समृद्ध करणाऱ्या …

Read More »

गुरू – शिष्य नाते : आत्मोन्नतीचा शाश्वत मार्ग

  जगात अनेक कला, विद्या आणि शास्त्रे आहेत. त्या शिकविणारे गुरू, शिक्षक आणि प्राचार्य शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये मिळतात. या विद्यांमुळे माणसाला उपजीविका, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखाची साधने प्राप्त होतात. परंतु भौतिक सुखाची साधने मिळाली म्हणजे मानसिक समाधान मिळतेच असे नाही. अधिकाधिक सुखाच्या शोधात माणूस धावत राहतो; पण अंतःकरणातील शांती, …

Read More »

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : एक आदर्श व्यक्तिमत्व

  – डॉ. चंद्रकांत वाघमारे, बेळगाव कोल्हापूरचे महाराज, दीनदलित, आदिवासी, कष्टकरी- रयतचे लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांची आज 26 जून ही जयंती भारतभर साजरी होत आहे, त्यानिमित्त…. गोरगरीब जनतेच्या हिताचा कारभार कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा कार्यकाळ आपण बघू शकतो. आपल्या राज्यकारभारात त्यांनी सामाजिक, राजकीय, …

Read More »