Friday , November 6 2026
Breaking News

६१ तासांनंतर चक्काजाम आंदोलन स्थगित; ऊस दराचा तिढा अखेर सुटला!

Spread the love

 

राजू शेट्टी यांची घोषणा; पहिली उचल प्रतिटन ३,९०० रुपये, अतिरिक्त १०० रुपये आणि साखरेचे दर वाढल्यास आणखी २०० रुपये मिळणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराच्या प्रश्नावरून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. तब्बल ६१ तासांच्या आंदोलनानंतर किणी टोल नाका येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ऊस दराबाबत तोडगा निघाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४,२०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी मागणी संघटनेने केली होती. मात्र, चर्चेअंती नव्या दराचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल देण्यात येणार असून, चालू गळीत हंगामासाठी अतिरिक्त १०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच भविष्यात साखरेच्या बाजारभावात वाढ झाल्यास आणखी २०० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

किणी टोल नाका येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बोलताना राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळेच हा तोडगा शक्य झाल्याचे सांगितले. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने शुक्रवारी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंदही स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे-बेंगळुर महामार्गावरील ६१ तासांपासून विस्कळीत झालेली वाहतूकही पूर्ववत होण्यास मदत होणार असून, ऊस गाळप हंगामाला आता वेग येण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

बाळूमामा देवस्थान घोटाळा प्रकरणाला वेग; आरोपी फरार, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास तीव्र

Spread the love  कोल्हापूर : आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी 75 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *