Wednesday , November 29 2023

Belgaum Varta

वाढीव वीज बिल रद्द न केल्यास उपोषण

  यंत्रमागधारक असोसिएशनची मागणी ; तहसील, हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमाग धारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याच वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष झाले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी ६ डिसेंबर पर्यंत वाढीव …

Read More »

पावसाचे नव्हे, नळाचे पाणी

  बस स्थानकात दलदल; तोट्या खराब झाल्याने नंतर पाणी वाया निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकाच्या निर्मिती वेळी चालक वाहकासह प्रवासासाठी आजाराच्या इमारती जवळच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. पण तोट्या खराब झाल्याने गेल्या दोन दिवसापासून नळाचे पाणी वाया जात आहे. सदरचे पाणी बस स्थानक आवारात पसरत असल्याने निर्माण …

Read More »

खानापूर समितीच्यावतीने महामेळाव्या संदर्भात जनजागृती

  खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा …

Read More »

कॅपिटल वन एकांकिका जाहीर; 3 व 4 फेब्रुवारीला होणार स्पर्धा

  बेळगाव : सहकार क्षेत्रातउत्तरोत्तर प्रगती साध्य करीत असलेल्या कॅपिटल वन संस्थेच्या पंधराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एकांकिका स्पर्धा – 2024 जाहीर झाल्या आहेत. विविध पृथ्यकरणाच्या आधारावर वर्षानुवर्षे या स्पर्धा पारदर्शक व लोकप्रिय होत असून मागील वर्षाप्रमाणेच नविन स्वरुपात व सुधारीत नियमावलींच्या अधारावरच यंदाची स्पर्धा आंतरराज्य व बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय …

Read More »

विधानसौध घेराओमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

  राजू पोवार; ढोणेवाडी येथे जनजागृती निपाणी (वार्ता) : सरकारने जाहीर केलेल्या सूचनेनुसार गतवर्षीच्या ऊसाला प्रतिटन १५० रुपये द्यावे. यंदाच्या हंगामात उसाला कारखान्यांनी ३५०० रुपये व सरकारने २ हजार रुपये द्यावे, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे जनजागृती केली जात आहे. वारंवार निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हिवाळी अधिवेशनात ७ डिसेंबर रोजी …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म. ए. समितीचा महामेळाव्यासंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार दिनांक ३० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे होणार आहे. या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, युवाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, मराठी …

Read More »

महामेळावा यशस्वी करण्याचा शहर समितीच्या बैठकीत निर्धार!

  बेळगाव : बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषिक नागरिक या महामेळाव्यात सहभागी होईल, असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Read More »

१७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेले ४१ पैकी ४१ मजूर बाहेर

  नवी दिल्ली : उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसापासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू होते. अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पाईप टाकण्यात आला होता. एनडीआरएफ देखील त्यांच्या पर्यंत पोहोचली आहे, आता एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश आले आहे. एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अडकलेल्या सर्व ४१ मजुरांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश …

Read More »

वैयक्तिक वादाला भाजपकडून राजकीय रंग : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करून सोडल्याच्या नोंदी पोलिसांकडे आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणे ही भाजपची जुनी सवय आहे. नगरसेवक हाणामारी प्रकरणाला काँग्रेस- भाजप असा …

Read More »

निपाणीजवळ अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू

  निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर हालसिद्धनाथ साखर कारखाना प्रवेशद्वारा समोर कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार दिनकर रामचंद्र दिंडे (वय ७५ रा. सौंदलगा) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली आहे. सौंदलगाव येथून निपाणी येथे सायकलवरून कामानिमित्त दिनकर हे …

Read More »