आदर्श गणेश विसर्जन मिरवणुकीला पोलिसांकडून पुरस्कार बेळगाव : गणेशोत्सवातील पारंपरिक संस्कृती आणि शिस्तबद्ध मिरवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव पोलिस विभागाने यंदा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर करून शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि आदर्श गणेश विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या गणेश मंडळांना पोलिस विभागाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी तीन …
Read More »निपाणीचा उरुस शांततेत पार पाडा; उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी
निपाणीत शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांचा ऊरूस बुधवार (ता.२२) पासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त शहर पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी ऊरूस उत्सव शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावे. ऊरूस काळात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा …
Read More »गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत रोषणाईचा झगमगाट
यूएसबी लाइट माळांना मागणी; ५० पेक्षा अधिक प्रकार निपाणी (वार्ता) : गणेशोत्सवाला १ दिवस शिल्लक असल्याने बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे. अशोकनगर, चाटे मार्केट, बेळगाव नाका, जुना पीबी रोड परिसरातील इलेक्ट्रिक दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून विविध प्रकारच्या विद्युत …
Read More »बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत भक्तांची जत्रा
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या; रविवारी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी बेळगाव : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. कल्पकतेला आणि कलाविष्काराला वाव देणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीने घराघरांत लगबग सुरू झाली असून, त्याचे प्रतिबिंब रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये उमटले. गणेशोत्सवासाठी आवश्यक सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या …
Read More »सीमाप्रश्नाच्या खटल्याला बळ; ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळ सुब्रमण्यम यांची महाराष्ट्र सरकारकडून नियुक्ती
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असून, त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या खटल्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळ सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याने सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन लढ्याला आणखी बळ मिळणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने तज्ज्ञ व …
Read More »मुख्याध्यापिका सौ. निर्मला गुरव यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
तुरमुरी (बेळगाव) : मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मला म. गुरव यांना नुकताच शिक्षकदिनाच्या दिवशी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 34 वर्षे ज्ञानदानाचे अविरतपणे पवित्र सेवा बजावली. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक सामाजिक कार्यात मोलाचं योगदान दिले शिस्त, नम्रता, आत्मविश्वास, उत्तम …
Read More »कुद्रेमानीतील शेतकऱ्यांची ‘गन्ना मास्टर ऊस जत्रेला’ भेट
ऊस उत्पादनवाढीसाठी नवतंत्रज्ञानाचा घेतला प्रत्यक्ष अभ्यास कुद्रेमानी : ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ साधण्यासाठी कुद्रेमानी येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा येथे सुरू असलेल्या ‘गन्ना मास्टर ऊस जत्रा २०२६’ प्रदर्शनाला भेट देऊन विविध तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास केला. शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी रवि पाटील, विजय …
Read More »गणेशमूर्ती प्रतिष्ठानपणा मिरवणुकीत महिलांशी गैरवर्तन; हुबळीमध्ये तणाव
महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा दाखल; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध हुबळी : गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही तरुणांनी महिलांशी कथितरित्या गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना हुबळी येथे घडली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हुबळीतील मराठा गल्ली ते सीबीटीकडे जाणाऱ्या मार्गावर मेदार गल्ली आणि कलाल गल्ली …
Read More »कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत ‘क्रांतीज्योती लेखक- वाचक संघा’चे उद्घाटन
बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा तसेच लेखन व अभिव्यक्ती कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत ‘क्रांतीज्योती लेखक- वाचक संघा’चे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. “वाचनामुळे ज्ञान वाढते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो किंबहुना माणसाला माणूस म्हणून खरी ओळख …
Read More »शिरोलीच्या विद्यार्थ्यांची बुद्धीबळ व बॅडमिंटनमध्ये जिल्हास्तरीय निवड
खानापूर : नुकताच खानापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धीबळ व बॅडमिंटन स्पर्धेत शासकीय माध्यमिक विद्यालय, शिरोली, ता. खानापूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुद्धीबळ स्पर्धेत सानिका कोवाडकर, सानिका गावकर, परशराम गावकर आणि महादेव दळवी यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta