Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

ड्रायफ्रूट्सच्या दागिन्यांनी सजला माळी गल्लीचा पर्यावरणपूरक गणराया

  झगमगाटाला फाटा देत साधेपणाने स्थापना; सलग सहाव्या वर्षी पर्यावरण संवर्धनाचा संदेश बेळगाव : विद्येची आणि कलेची देवता असलेल्या श्री गणरायाचे सोमवारी उत्साहात आगमन झाले. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना, गणेशोत्सवाचा उत्साह पर्यावरणपूरक असावा, या उद्देशाने माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सलग सहाव्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली …

Read More »

मराठी शाळांच्या घटत्या संख्येवर भाष्य करणारी गणेशोत्सवाची सजावट

  रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे शासकीय मराठी प्राथमिक शाळा क्र. ३४, अनगोळ येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना बेळगाव : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या वतीने अनगोळ येथील शासकीय मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ३४ येथे गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशमूर्तीचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे आगमन करण्यात आले. …

Read More »

बेळगावातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू; आमदार आसिफ सेठ यांनी घेतली घटनास्थळी धाव

  पहाटे ३.३० वाजता घटनास्थळी भेट; मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरात मध्यरात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ आणि युवा नेते अमन सेठ यांनी पहाटे ३.३० वाजता घटनास्थळी धाव घेत …

Read More »

सौन्दत्ती-धारवाड मार्गावर केएसआरटीसी – बस भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

  बेळगाव : सौन्दत्ती-धारवाड मार्गावर केएसआरटीसी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (१५ सप्टेंबर) ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख विनोद जोगेन्नवर (२२), आकाश जाधव (२०) आणि रवी कुरुबर (२२) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे तरुण दुचाकीवरून सौन्दत्ती-धारवाड मार्गावरून प्रवास करीत होते. यावेळी …

Read More »

पावसाची दडी : भातपिके करपू लागली, शेतकरी चिंतेत

  पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, खर्चही वसूल होण्याची चिंता बेळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील भातपिके करपू लागली आहेत. पिके हातातोंडाशी आली असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आतापर्यंत केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांनी भाताची …

Read More »

चव्हाट गल्लीत एकाच कुटुंबातील चौघांचा आगीत जळून मृत्यू; दोघे गंभीर

  बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली येथे मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. गणेशोत्सवाच्या उत्साहात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने बेळगाव शहर हादरले आहे. मृतांमध्ये शारदा धमुने (४५) आणि भारती धमुने (५०) प्रिया धमुने (२८) आणि गंगा धमुने (२५) यांचा …

Read More »

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मृणाल हेब्बाळकर यांच्यावर एआयसीसीची महत्त्वाची जबाबदारी

बेळगावच्या युवा नेत्याची काँग्रेस हायकमांडकडून समन्वयकपदी नियुक्ती नवी दिल्ली : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) माध्यम आणि प्रचाराशी संबंधित उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी चार समन्वयकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये बेळगावचे युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. AICCच्या माध्यम व प्रचार …

Read More »

निपाणीत उद्या संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा

  निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील रोहिदासनगर येथील एचपी गॅस गोडावूनच्या मागील बाजूस असलेल्या हालसिद्धनाथ मंदिर परिसरातील श्री संत गजानन महाराज संस्थानतर्फे श्री संत गजानन महाराज यांचा ११७ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवारी (ता. १५) विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. पुण्यतिथीनिमित्त सकाळी ८ ते ९.३० या वेळेत श्रींचे पारायण होणार …

Read More »

कणगला येथे ट्रक उलटून चालक गंभीर

  निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणगला येथील केआयडीसी वळणावर ट्रक उलटून चालक गंभीर जखमी झाला. विक्रम श्रीकांत गीते (वय ३८, रा. बीड) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर संकेश्वर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कणगला के आयडीसी वळणावर कोंबडी खाद्यासाठी मका …

Read More »

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज

  घरगुती मूर्तींसाठी सहा फिरते विसर्जन कुंड; शहरातील विसर्जन तलावांची स्वच्छता व रंगरंगोटी पूर्ण बेळगाव : लाडक्या गणरायाचे आज घरोघरी उत्साहात आगमन झाले असून, यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बेळगाव महानगरपालिकेने आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून, घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात सहा फिरते विसर्जन …

Read More »