Friday , November 6 2026
Breaking News

केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे सीमाप्रश्न प्रलंबित

Spread the love

 

शिवसेनाप्रमुख बाबासाहेब खांबे ; निपाणीत काळा दिन कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही सनदशीर, लोकशाही मार्गाने या भागातील मराठी बांधव या प्रश्नावर लढा देत आहेत. तरीही केंद्र आणि महाराष्ट्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. दोन्ही सरकारवर दबाव आणल्याशिवाय हा प्रश्न निकालात निघणे कठीण आहे. शिवाय मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोमवारी (ता.१६) कोल्हापूर येथील कॉम्रेड एन. डी. पाटील यांच्या समाधी स्थळावर व्यापक बैठक घेण्यात येणार आहे. पुढील काळात या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी युवकांचे संघटन महत्वाचे आहे, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी व्यक्त केले.
येथील मराठा मंडळमध्ये आयोजित काळा दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर यांनी, सीमा प्रश्नाच्या चळवळीत चौथ्या पिढीने सहभाग घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न निकालात निघण्याची आशा आहे. राज्यघटनेनुसार न्याय आणि हक्क मिळावा, यासाठी न्यायालयात दावा दाखल झाला आहे. तज्ञ समिती यावर कार्यरत असून लवकरच मराठी भाषिक कन्नडगींच्या अन्यायापासून दूर जाणार असल्याचे सांगितले.
के. डी. पाटील यांनी, सीमा लढ्यात नवीन पिढी उतरली असून त्यांच्या पाठीशी आपण असल्याचे सांगितले. लक्ष्मीकांत पाटील यांनी, सीमा प्रश्नासाठी बऱ्याच वेळा मुंबईच्या फेऱ्या केल्या. पण त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. सर्वच शासकीय कार्यालयात कन्नड सक्तीसाठी दादागिरी सुरू आहे. भविष्यात मराठी माणसांचा उद्रेक होण्यापूर्वीच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने हा प्रश्न निकालात काढण्याची मागणी केली. यावेळी अजित पाटील, नवनाथ चव्हाण, बंडा पाटील, कबीर वराळे, उदय शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास श्रीमंत विजय राजे देसाई -निपाणकर, प्रा. नानासाहेब जामदार, प्रशांत नाईक, किरण पाटोळे, राजेंद्र चव्हाण, किरण कोकरे, किसन दावणे, सुधाकर माने, दीपक वळीवडे, सुनील हिरूगडे, संदीप चावरेकर, प्रवीण हेगडे, यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मराठी बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *