Friday , November 6 2026
Breaking News

डिजिटल युगातही खाते वह्यांचे स्थान अबाधित

Spread the love

 

वह्यांच्या खरेदीची निपाणीत व्यापाऱ्यांची गर्दी

निपाणी (वार्ता) : एका क्लिकवर लाखोंचे व्यवहार, संगणकावर क्षणात हिशेब आणि मोबाईलवर खात्यांचा संपूर्ण तपशील येतो. डिजिटल युगातील या बदलांनाही व्यापाऱ्यांच्या मनातील पारंपरिक खाते किर्द वह्यांचे स्थान टिकून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला स्वीकारतानाच वर्षानुवर्षांची परंपरा जपण्याला व्यापारी वर्गाची पसंती आहे. त्यामुळेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत पारंपरिक खाते वह्यांच्या खरेदी खरेदीची शहरात लगबग सुरू आहे.
धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या शुभमुहूर्तावर नवीन खातेवहीचे पूजन करून त्यात पहिली नोंद केली जाते. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात शुभ होऊन व्यवसायात भरभराट व्हावी, अशी श्रद्धा त्यामागे आहे.
यंदा खातेवही दुकानात पारंपरिक लाल रंगाच्या आकर्षक रंगसंगती, विविध आकार आणि वेगवेगळ्या डिझाइनमधील खाते वह्या उपलब्ध आहेत. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार फर्मचे नाव, लोगो आणि खास रचना छापून देण्याची सुविधाही विक्रेत्यां कडून केली आहे. १०० रुपयांपासून पुढे या खातेवह्या उपलब्ध आहेत.
—————————————————————–
‘तंत्रज्ञानामुळे अकाउंटिंगच्या पद्धती बदलल्या आहेत. खातेवहीत व्यवहारांची नोंद स्वतःच्या हाताने केल्याने हिशेबावर नियंत्रण राहते.शिवाय वर्षानुवर्षाचा आर्थिक तपशील जतन करता येतो. डिजिटल प्रणालीतील तांत्रिक अडचणी किंवा माहिती गमावण्याच्या संभाव्य धोक्याच्या तुलनेत जुनी- नवीन खातेवही व्यापाऱ्यांना अधिक सोयीची वाटते. त्यामुळे व्यापारी वह्यांच्या पद्धतींचा वापर करताना दिसत आहेत.’
-वीरकुमार गुंडे, खाते किर्द वह्यांचे व्यापारी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

घराघरातील फराळ चाललाय विदेशात

Spread the love    आंतरराष्ट्रीय पार्सल दरांत २० टक्क्यांनी घट; शहर, परिसरातून बुकिंगला प्रतिसाद निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *