Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

चव्हाट गल्ली स्फोट प्रकरणाला धक्कादायक वळण : स्फोटापूर्वी बकेट घेऊन आलेला अनोळखी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद

पोलिस तपासाला नवा धागा बेळगाव : गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या एका कुटुंबावर काळाचा घाला घालणाऱ्या चवाट गल्लीतील डोर गल्ली येथील स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री फ्रिजचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या सात दिवसांनंतर शेजारील घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी एका अनोळखी …

Read More »

इस्कॉनमध्ये राधाष्टमी उत्साहात साजरी

  बेळगाव : इस्कॉन चळवळीत श्रीमती राधा राणी यांचा जन्मदिन हा राधाष्टमी उत्सव म्हणून साजरा केला जातो. बेळगाव इस्कॉन च्या वतीने शनिवारी श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात राधाष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शनिवारी पहाटे मंगल आरती व श्रृंगार दर्शन झाल्यानंतर रशियाहून आलेल्या ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य श्री भक्ती विज्ञान …

Read More »

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रमही या उत्सवाला अधिक अर्थपूर्ण बनवतात. याच भावनेतून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, केळकर बाग येथील ‘बेळगांवचा कैवारी’ मंडळातर्फे यंदा ‘ज्ञान दान’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. गणपती बाप्पाला विद्या, ज्ञान आणि कलेचे दैवत मानले …

Read More »

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी : दुसऱ्या बाळंतपणानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने निलजी (ता. बेळगाव) येथील ब्रह्मलिंग गल्लीतील सौ. ज्योती निवृत्ती पाटील (वय २६) यांचा हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १७) पहाटे मृत्यू झाला. अवघ्या २६व्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली …

Read More »

दूध दरवाढीची शक्यता; प्रतिलिटर ८ रुपयांची वाढ मागण्याची तयारी

  बेळगाव : महागाईचा वाढता दबाव आणि पशुखाद्यासह दूध उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता कर्नाटकात दूध दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. दूध संघ आणि उत्पादकांकडून प्रतिलिटर ८ रुपयांची दरवाढ करण्याची मागणी राज्य सरकार आणि कर्नाटक दूध महामंडळाकडे करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आहेत. दूध दरवाढीबाबत चर्चा करून सरकारकडे अधिकृत …

Read More »

कारभार गल्ली गणेशोत्सव मंडळातर्फे उद्या गणहोम, सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद

  बेळगाव : वडगाव येथील कारभार गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘वडगावचा मानाचा राजा’ या गणेशमूर्तीचे शताब्दी वर्ष असल्याने मंडळातर्फे विशेष धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गणहोम तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात …

Read More »

हार्मनी कॉलनीत सीसी रस्ता, पेव्हर रस्ता व गटार कामांना प्रारंभ

    बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत हार्मनी कॉलनी येथे सीसी रस्ता, पेव्हर रस्ता तसेच गटार बांधकामाच्या विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या अनेक दिवसांपासूनच्या मूलभूत सुविधांच्या मागणीची दखल घेऊन ही कामे हाती घेण्यात आली आहेत. परिसरातील …

Read More »

भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; संजीविनीच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

  वडगाव : आदर्श नगर, वडगाव येथील संजीविनी फौंडेशनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून रंग व थर्माकोलचा वापर टाळण्यात आला. फौंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी कार्डशीट व पुठ्ठ्याचा वापर करून आकर्षक सजावट केली. पाच दिवसांच्या उत्सवात दररोज सकाळ-सायंकाळ गणरायाची आरती भक्तिभावाने करण्यात आली. आसावरी भोकरे …

Read More »

रेशन ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ; आता २० ऑक्टोबरपर्यंत संधी

  सर्व्हरच्या समस्येमुळे रखडले ५० टक्के काम; रेशन दुकानांच्या वेळेतही बदल बेळगाव : रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सर्व्हरच्या तांत्रिक समस्येमुळे रखडल्याने अन्न व नागरी पुरवठा खात्याने ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता रेशन कार्डधारकांना २० ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. याशिवाय रेशन दुकानांच्या कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, …

Read More »

सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरप्रमाणे हिटचा तडाखा; पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

भातासह भुईमूग, रताळी, बटाटा व भाजीपाला कोमेजला; शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे बेळगाव : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटप्रमाणे जाणवणाऱ्या उष्म्याने नागरिक हैराण झाले असताना, दुसरीकडे पावसाने दिलेल्या दडीमुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने भातासह विविध पिके कोमेजून करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उरलीसुरली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ …

Read More »