Friday , September 20 2024
Breaking News

सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आल्यानंतर घरकाम करणारी महिला बेपत्ता

Spread the love

 

बेंगळुरू : जेडीएसचे नेते प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पळ काढला असला तरी त्यांचे वडील आणि जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नव्या घडामोडींनुसार कर्नाटकचे माजी मंत्री असलेल्या एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. रेवण्णा यांच्या निवासस्थानी घरकाम करणारी महिला बेपत्ता झाल्यानंतर या महिलेच्या मुलाने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. सदर महिलेचाही व्हिडीओ या सेक्स टेप स्कँडलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आमदार एचडी रेवण्णा आणि त्यांचा सहकारी सतीश बबण्णा यांच्याविरोधात अपहरण आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला. एफआयआरनुसार, सदर घटना २९ एप्रिलची आहे. बेपत्ता झालेली महिला रेवण्णा यांच्या होलेनारसिपुरा येथे असलेल्या फार्महाऊसवर घरकाम करत होती. सहा वर्ष सदर महिलेने रेवण्णा यांच्या घरी काम केले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी हे काम सोडून ती पुन्हा गावात रोजंदारीवर काम करू लागली.
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी कर्नाटकात पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू झाले. त्यावेळी सतीश बबण्णा हे सदर महिलेच्या घरी आले आणि त्यांनी या महिलेला पुन्हा कामासाठी येण्यासाठी विनवणी केली. रेवण्णा यांची पत्नी भवानी यांनी घरकामासाठी बोलावले असल्याचे सांगून बबण्णा हे सदर महिलेला घेऊन गेले. तसेच पोलिसांनी जर विचारणा केली, तर त्यांना काहीही सांगू नका, असेही बबण्णाने महिलेच्या कुटुंबियांना बजावले होते.

२९ एप्रिल रोजी बबण्णा याने पुन्हा एकदा महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. पोलिसांनी जर महिलेला ताब्यात घेतले, तर तिच्यावरही खटला दाखल होऊ शकतो, अशी भीती दाखविली. त्यामुळे रेवण्णा यांनी महिलेला आपल्याकडे ठेवून घेतले आहे, अशी माहिती बबण्णा यांनी दिल्याचे तरुणाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले. “१ मे पासून मी माझ्या आईचा शोध घेत आहे. माझ्या मित्रांनी मला सांगितले की, प्रज्ज्वलच्या सेक्स टेप प्रकरणात माझ्या आईचेही नाव घेतले गेले. त्यामुळे मी सतीश बबण्णाला फोन करून आई कुठे आहे? याची विचारणा केली. तेव्हा तो म्हणाला की, आईवर खटला दाखल झाला असून तिला जामीन मिळणार आहे”, अशी माहिती तरुणाने एफआयआरमध्ये दिली.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न

Spread the love  खानापूर : खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *