Monday , September 21 2026
Breaking News

डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बेळगावातून सतीश जारकीहोळी घेणार मंत्री पदाची शपथ

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झालेल्या नव्या सरकारच्या स्थापनेला बुधवारी सायंकाळी औपचारिक सुरुवात होत असून, नव्या मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात १४ जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली असून, बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

राज्यपालांकडे शपथविधीसाठी सादर करण्यात आलेल्या अधिकृत यादीत मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार पदभार स्वीकारणार असून, त्यांच्यासोबत डॉ. जी. परमेश्वर, के. एच. मुनीयप्पा, के. जे. जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी, कृष्णा बेरेगौडा, प्रियांक खर्गे, यु टी खादर, ईश्वर खंडरे, यतींद्र सिद्धरामय्या, शरणप्रकाश पाटील, भैरती सुरेश हे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

काँग्रेस पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देत विविध प्रदेश व समाजघटकांचे प्रतिनिधित्व राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश जारकीहोळी यांच्या समावेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधीनंतर खातेवाटपाची प्रक्रिया सुरू होणार असून, नव्या सरकारमधील महत्त्वाची खाती कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *