Friday , November 6 2026
Breaking News

आंतरराज्य जलतरण स्पर्धेत तनुज, दक्ष, अद्वैत, वर्धा यांना वैयक्तिक चॅम्पियनशिप

Spread the love

 

बेळगाव : नुकत्याच गोवा पणजी येथे फिट फॉर लाईफ आयोजित आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी घवघवीत यश संपादन करताना एकूण 48 पदके संपादन केली. यामध्ये 20 सुवर्ण 15 रौप्य व 13 कांस्य पदकांचा समावेश आहे.
कुमार तनुज सिंग यांने ग्रुप 1 मध्ये पाच सुवर्णपदकासह वैयक्तिक चॅम्पियनशिप तसेच फास्टेस्ट स्विमर या बहुमानासह रुपये 6000 रोख बक्षिसाची रक्कम मिळविली.
कुमार दक्ष जाधव याने ग्रुप तीन मध्ये तीन सुवर्ण व एक रौप्य पदक संपादन करून वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळविली.
कुमार अद्वैत जोशी यांने ग्रुप चार मध्ये पाच सुवर्णपदकासह वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकाविली.
कुमारी वर्धा उप्पार हिने दोन सुवर्ण पदकासह गट पाच मध्ये वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली.
याचबरोबर कुमार आदी शिरसाठ दोन सुवर्ण तीन रौप्य, अर्णव किल्लेकर दोन सुवर्ण एक रौप्य एक कांस्य, कुमार वर्धन नाकाडी तीन रौप्य दोन कांस्य, विराट उपार तीन रौप्य दोन कांस्य, धैर्य शिंदे एक सुवर्ण, शिवा पोटे एक कांस्य, आस्था काकडे एक कांस्य, तनिषा खनूकर एक कांस्य, आराध्या तिवारी एक कांस्य, जिजा कर्लेकर दोन रौप्य एक कांस्य, पुनर्वि मोदगेकर एक कांस्य अशी पदके संपादन केली.
वरील सर्व जलतरणपटूंना आबा हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील,किशोर पाटील, प्रसाद दरवंदर, विजय नाईक, कलाप्पा पाटील, मारुती घाडी यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच हिंदी क्लबचे अध्यक्ष श्री. अरविंद संगोळी, श्री. शितल हुलभते, सौ. शुभांगी मुंगळूरकर, श्री राजू मुंदडा यांचे प्रोत्साहन लाभते.

About Belgaum Varta

Check Also

निरोगी भविष्याच्या दिशेने रोटरी दर्पणचे पाऊल!

Spread the love  मार्कंडेय नगर सरकारी शाळेत २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; गरजू विद्यार्थ्यांना मोफत औषधांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *