Tuesday , October 15 2024
Breaking News

LOCAL NEWS

चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या फर्निचर व्यावसायिकांना शुभेच्छा

  बेळगाव : चारधाम यात्रेसाठी बेळगाव शहरातील फर्निचर व्यावसायिक नारायण पाटील, कल्लाप्पा सक्रोजी आणि तानाजी सुतार हे आज रवाना झाले त्यांना शुभेच्छा व निरोप देण्याचा कार्यक्रम रविवारी दुपारी उत्साहात पार पडला. रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील खानापूर रोडवरील अमर फर्निचर येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमर फर्निचरचे मालक यल्लाप्पा अकनोजी हे …

Read More »

पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी

  बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु असून या आंदोलनाला सरकार म्हणावा तसा प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत पंचमसाली समाजाची आरक्षणाच्या विषयावर बैठक होणार होती, मात्र बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांचे कोणतेच संकेत मिळाले नाहीत. यामुळे १८ ऑक्टोबर रोजी पंचमसाली समाजाच्या …

Read More »

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग उद्या

  बेळगाव : शहापूर येथील सरस्वती वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम पार पाडले जात आहेत. याच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग उद्या दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता येथील लोकमान्य रंगमंदिर …

Read More »

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण

  बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस बेळगाव शहरातील विवेकानंद मार्ग (रिसालदार गल्ली) येथील स्वामी विवेकानंद स्मारकात वास्तव्य केले होते. त्या पावन दिनाच्या स्मरणार्थ येत्या बुधवार दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विवेकानंद स्मारक जनतेसाठी खुले ठेवण्यात येणार असून …

Read More »

श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराजांचा ११९ वा पुण्यतिथी उत्सव

  पुणे : थोर संतश्रेष्ठ व अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११९ वा पुण्यतिथी उत्सव अश्विन वद्य २ ते ४ या तिथीला शुक्रवार १८ ते रविवार २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बेळगांव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे साजरा होणार असून त्यानिमित्त उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी …

Read More »

सीमोल्लंघन मैदानाची जायंट्स मेन कडून स्वच्छता

  बेळगाव : विजयादशमी दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतन मैदानावर साजरा केला जातो. वेगवेगळ्या भागातून देवाच्या पालख्या तिथे येतात. सोने लुटण्याबरोबरच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल्स सुद्धा लावले जातात. बेळगाव शहरातील जनता मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी उपस्थित असते सामाजिक बांधिलकीची जाण म्हणून 12 वर्षापासून जायंट्सच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. जायंटस् …

Read More »

कार पार्किंग येथे बुधवारी कोजागिरी पौर्णिमा

  बेळगाव : सांप्रदायिक भजनी मंडळ बापट गल्ली (कार पार्किंग) बेळगाव यांच्या वतीने बुधवार दिनांक 16 रोजी श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात मंदिरात सायंकाळी 7 वाजता कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यावेळी कोजागिरी पौर्णिमा, काकड आरती, दीपोत्सव, भजन व आवळी भोजन असा संयुक्त कार्यक्रम पार पडणार आहे. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या मराठी पत्रकारांचा सन्मान

  बेळगाव : काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, मराठी भाषिकांच्या वतीने अनेक वर्षाच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सर्व मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याचे औचित्य साधून युवा समितीच्या वतीने बेळगावमधील मराठी पत्रकारांचा …

Read More »

सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होईपर्यंत काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार

  बेळगाव : ६७ वर्षापासून सीमा बांधव काळा दिन मोठ्या गांभीर्याने पाळतात. येणाऱ्या काळा दिनाच्या सायकल फेरीला परवानगी देऊ अथवा ना देवो आम्ही ही सायकल फेरी निर्धाराने पार पाडू असा, निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी व्यक्त केला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दि. १३ रोजी …

Read More »

जायंट्स इंटरनॅशनलचे वर्ल्ड डेप्युटी चेअरमन प्रफुल्ल जोशी यांची जायंट्स भवनला सदिच्छा भेट

  बेळगाव : जायंट्स फेडरेशन सहाच्या कार्यक्रमासाठी बेळगावला आलेले जायंट्स इंटरनॅशनलचे वर्ल्ड डेप्युटी चेअरमन प्रफुल्ल जोशी यांनी जायंट्स भवनला सदिच्छा भेट दिली त्यांच्यासमवेत सेंट्रल कमिटी सदस्य दिनकर अमीन होते. त्यांचे स्वागत जायंट्स मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले. जायंट्स सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील आणि सहकाऱ्यांनी प्रफुल्ल …

Read More »