Sunday , July 26 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे 24 वे मराठी बाल साहित्य संमेलन 16 नोव्हेंबर रोजी

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन कॅम्प बेळगाव येथे संपन्न झाली. बैठकीत सर्व प्रथम उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मांडून महाराष्ट्र राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले. शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी साठे मराठी प्रबोधिनीचे 24 वे मराठी बाल साहित्य संमेलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. विश्वजित हसबे यांची एकमताने निवड करण्यात आली. या बाल साहित्य संमेलनात प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे कवी संमेलन, कथाकथन व साने गुरुजींच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली जाणार आहे. तसेच शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या कथाकथन स्पर्धांमध्ये निवड झालेल्या कथा बालसाहित्य संमेलनात सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बैठकीत अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर, सचिव श्री. सुभाष ओऊळकर, सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, बसवंत शहापूरकर, नीला आपटे, हर्षदा सुंठणकर, गौरी चौगुले, इंद्रजीत मोरे, धीरजसिंह राजपूत, गजानन सावंत उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

One comment

  1. sangeeta Ajarekar

    परंतु ते बालपण आज राहिलेल नाही हो……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *