Saturday , November 7 2026
Breaking News

दूध संस्थामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थैर्य

Spread the love

 

पृथ्वीराज पाटील; अरिहंत दूध संघातर्फे लाभांश वितरण
निपाणी (वार्ता) : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टांना प्रोत्साहन देण्यासाठी बोरगाव येथील ‌अरिहंत दूध – प्रोड्युसर्स युनियनतर्फे सदस्यांना दिवाळीनिमित्त युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते लाभांश देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना युवा नेते पृथ्वीराज पाटील म्हणाले, दूध व्यवसाय हा ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. दूध उत्पादक शेतकरी अहोरात्र मेहनत घेऊन संघाला दूध पुरवठा करतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेत अरिहंत दूध उत्पादक संघाने सभासदांना बोनस देऊन त्यांच्या कष्टांचा सन्मान केला आहे. सहकार रत्न उत्तम पाटील यांनी शेतीच्या जोडधंद्याला चालना दिली आहे. या व्यवसायाला सहकारी दूध संस्थांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली आहे. दूध उत्पादकांना अधिक प्रोत्साहन मिळून दूध व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी अरिहंत संस्था ‌तत्पर असल्याचे सांगितले.
व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी दूध उत्पादकांच्या हितासाठी संघाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.आर्थिक वर्षात दूध संघाकडून म्हैस व गाईंचे एकूण २,२६,७८९ लिटर दूध संकलित केले आहे. यंदा म्हैस दूध उत्पादकांना ४ टक्के व गाय दूध उत्पादकांना ३ टक्के बोनस देत ८ लाख ९८ हजार ७८ रुपयांचा विक्रमी बोनस वितरण केल्या सांगितले.
यावर्षी म्हैश दूध उत्पादनमध्ये प्रकाशित चव्हाण, अशोक मुळे व सुरेश छडेदार यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. गाय दूध उत्पादकामध्ये भरत अम्मन्नावर आणि कल्लाप्पा कुरुंदवाडे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले, त्यांना लाभांश व रोख बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकंदर अफराज, संचालक मायगोंडा पाटील शितल हवले, रमेश माळी, रावसाब पाटील, हिराचंद चव्हाण, बाळासाहेब माडीवाळ, भारती सावळवाडे, वैशाली बुलबुले, जयपाल कोरवी, कृषी संघाचे सीईओ आर.टी. चौगुला उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आकर्षक सवलतींनी फुलली इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ

Spread the love  दिवाळीत मोबाईल, टीव्ही, फ्रीज खरेदीकडे कल; अनेक वस्तूंच्या खरेदीवर गिफ्ट निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *