



निपाणी (वार्ता) : पश्चिम येथील पश्चिम सीआरसी तर्फे यांच्या श्रीनिकेतन स्कूल प्रज्ञाशोध स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये हरी नगर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे यश मिळविले.
वीर गुरव (चित्रकला) प्रथम, प्रिया कोपटे (कन्नड तोंडपाठ) प्रथम, आसावरी कुलकर्णी (कवन वाचन) प्रथम, खुशी सिंग (फॅन्सी ड्रेस) प्रथम आराध्या मगदूम (मराठी तोंडपाठ) प्रथम, सानवी लोहार (प्रबंध लेखन) द्वितीय मान्यता सावंत (देश भक्ती गीत) द्वितीय, आशिया करनाजी (सबक वाचन) द्वितीय प्रितम कोपटे (कन्नड तोंडपाठ) मध्ये यश मिळविले.
मोठ्या गटात यश खवरे (मराठी कंठपाठ), नवाज सय्यद (सबक वाचन, समेक जाधव (भक्ती गीत) उत्तेजनार्थ वेदेश लोहार (मात काम), वीर गुणके (देशभक्ती गीत कन्नड) उत्तेजनार्थ त्यांनी बक्षीस शेवट केले. यशस्वी विद्यार्थ्यांची एचडीएमसी अध्यक्ष महादेव खवरे यांच्य हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वाती कुलकर्णी, अश्विनी चव्हाण, मुख्याध्यापिका अलका बागल, के. एम. नलवडे, सारिका निगुरे, काजल घस्ते यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सुनील शेवाळे यांनी स्वागत केले. सदाशिव तराळ यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta