Friday , November 6 2026
Breaking News

मोहिशेत ग्राम पंचायतीचे पीडिओ व ऑपरेटर यांच्या समर्थनार्थ मोर्चा; कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

15 गावांतील 300 हून अधिक नागरिक व महिलांचा सहभाग

खानापूर : मोहिशेत ग्राम पंचायतीचे पीडिओ व संगणक ऑपरेटर विश्वनाथ गावडे यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, या मागणीसाठी त्यांच्या समर्थनार्थ महिलांसह शेकडो नागरिकांनी मोर्चा काढून खानापूर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेस्त्री यांना शुक्रवारी निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, मोहिशेत ग्राम पंचायतीचे पीडिओ व संगणक ऑपरेटर विश्वनाथ गावडे हे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडत आहेत. आजपर्यंत त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराबाबत कोणताही आरोप सिद्ध झाल्याची माहिती निदर्शनास आलेली नाही. असे असताना काही लोक विनाकारण खोटे आरोप करून त्यांची बदनामी करत आहेत व त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पीडिओ व संगणक ऑपरेटर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. चौकशी पूर्ण होण्यापूर्वी त्यांची विनाकारण बदली किंवा निलंबन यासारखी अन्यायकारक कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी मोहिशेत ग्रामपंचायत हद्दीतील 300 हून अधिक लोकांनी उपस्थित राहून केली.

यावेळी माजी ग्रा.पं. अध्यक्ष श्री. अनंत देसाई, माजी ग्रा. पं. अध्यक्ष परशराम घाडी, माजी सदस्य रामाक्का हणबर, माजी ग्राम सदस्य श्री. गणपती कसर्लेकर, माजी ग्राम सदस्य श्री. पांडुरंग गावडा, माजी ग्राम सदस्य श्री. डुमिंग शेराव, माजी ग्राम सदस्य कृष्णा गावडा, माजी जि.पं. सदस्य मुगुटसाब धारवाडी, PKPS चे उपाध्यक्ष व माजी ग्राम उपाध्यक्ष श्री. विनय देसाई, पुन्नाप्पा जाधव, गणपती झरंबेकर, संजय देसाई, दत्ताराम गावडे, बाबूराव पाटील, विजय कामत, पावलू फर्नांडिस, कृष्णा मिराशी, महादेव करंबळकर आदींसह मोहिशेत, वाटरा, दूधवाळ, हणबरवाडा, वरकड, पाटये, वरकड गवळीवाडा, अस्तोली, गवेगाळी, मुंडवाड, पिंपळे, सातनाळी, माचाळी, मांजरपै, घार्ली गावातील अनेक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

खानापूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी श्री. रमेश मेस्त्री यांनी निवेदन स्वीकारून सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *