Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वर

कोट शाळेला पाच संगणकांची देणगी

    ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी दड्डी : कोट, ता. हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेला अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, आझादनगर, अंधेरी पश्चिम, मुंबई या कंपनीकडून पाच संगणक देणगी स्वरूपात देण्यात आले. सलामवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन नरसू पाटील यांच्या प्रयत्नातून ही देणगी उपलब्ध झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना …

Read More »

सलामवाडीत बालवैज्ञानिकांचा महाकुंभ

विज्ञान प्रदर्शन व ‘टाकाऊतून टिकाऊ’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८० विद्यार्थ्यांचा सहभाग दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी : ‘नवसाचा ओंकारेश्वर बाप्पा’ यांच्या प्रेरणेतून तसेच कार्यकर्त्यांच्या निष्ठा, असीम प्रेम आणि उच्च विचारसरणीच्या बळावर आयोजित करण्यात आलेल्या ‘रणझुंजार क्रीडा व शैक्षणिक महोत्सव २०२६’ अंतर्गत विज्ञान प्रदर्शन व ‘टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे’ या स्पर्धांना …

Read More »

लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

  बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड मणगुती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालय, मणगुती येथील विद्यार्थ्यांनी हुक्केरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी सरकारी माध्यमिक शाळा, नेरली (ता. हुक्केरी) …

Read More »

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात साजरा करावा, यासाठी यमकनमर्डी पोलिस ठाण्याकडून विविध मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, मंडपाची सुरक्षा, मिरवणूक, ध्वनिक्षेपकाचा वापर तसेच विसर्जनाच्या वेळी मंडळांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे …

Read More »

सलामवाडीत श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा उत्साहात

  दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, भक्तगण तसेच मुंबई ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे सलामवाडीसह पंचक्रोशी परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. श्री हनुमान …

Read More »

सलामवाडीत श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा ४ सप्टेंबरला

  दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती व भक्तांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार मा. श्री. अण्णासाहेब जोल्ले यांच्या निधीतून, तसेच बेळगाव …

Read More »

मरणहोळ येथे बिबट्याचा म्हशीच्या रेडकावर हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

  दड्डी : मरणहोळ, ता. बेळगाव येथे शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जंगलालगत शेतात चरण्यासाठी सोडलेल्या म्हशीच्या दीड ते दोन वर्षांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे मरणहोळ परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी मारुती पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे जंगलालगत …

Read More »

सलामवाडी येथे भावेश्वरी देवीचा महाभिषेक सोहळा उद्या

  दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीचा महाभिषेक सोहळा उद्या, मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी धार्मिक व भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाभिषेक सोहळ्यानिमित्त सकाळपासून देवीची विशेष पूजा-अर्चा, …

Read More »

दड्डी भागात भात रोपलागणी अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांची पिकांच्या वाढीकडे लागली नजर

  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी परिसरात यंदाच्या खरीप हंगामातील भात रोपलागणीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रोपलागणी पूर्ण केली असून आता पिकांच्या जोमदार वाढीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दड्डी, मोदगे, खवनेवाडी, कोट, बेळळकी, धोंडगट्टे, गुडगनट्टी, शट्टीहळ्ळी, सलामवाडी आदी गावांतील …

Read More »

सापाच्या दंशाने शट्टिहळ्ळीत बैल दगावला

      दड्डी : हुक्केरी तालुक्यातील शट्टिहळ्ळी येथे सापाच्या दंशामुळे सुमारे ५० हजार रुपये किमतीचा सर्जा बैल दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी लक्ष्मण भागोजी आसदे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी बैलगाडीतून नाचणीची लागवड करण्यासाठी शेताकडे गेले होते. त्यांच्यासोबत घरातील व शेजारच्या …

Read More »