








पैठणी साडीची मानकरी सौ. रेखा शिवाजी बुवा
दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी : येथे ओंकार गणेश मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा व कौशल्याधारित उपक्रमांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या स्पर्धेत एकूण ५१ महिलांनी सहभाग घेतला होता. विविध फेऱ्यांनंतर अंतिम फेरीमध्ये सौ. रेखा शिवाजी बुवा यांनी प्रथम क्रमांक पटकावून पैठणी साडीची मानकरी होण्याचा बहुमान मिळविला. विशेष म्हणजे, सलग दोन वर्षे होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी पैठणी साडीची मानकरी होण्याचा मान मिळविला आहे.
द्वितीय क्रमांक सौ. दीपाली दशरथ गोंधळी यांनी पटकावला. त्यांना डिनर सेट बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांक सौ. शोभा मनोहर बराटे यांनी मिळविला असून त्यांना स्टीलचा हंडा बक्षीस देण्यात आला. चतुर्थ क्रमांक सौ. अयोध्या हरीश कुंभार यांनी पटकावला असून त्यांना घड्याळ बक्षीस देण्यात आले.
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कार्यक्रमस्थळी आनंदी व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेदरम्यान महिलांनी विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्या तसेच सहभागी महिलांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने ओंकार गणेश मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta