Sunday , October 4 2026
Breaking News

कलाश्रीच्या लकी ड्रॉमध्ये प्रसाद वंटमुरींना कारसह दीड लाखांचे बक्षीस

Spread the love

 

 

बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री उद्योग समूहातर्फे आयोजित पाचव्या बक्षीस योजनेच्या लकी ड्रॉमध्ये भाग्यनगर येथील रोटेरियन प्रसाद चंद्रकांत वंटमुरी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना कारसह रोख १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या हस्ते प्रसाद वंटमुरी यांना कारच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. बक्षीस मिळाल्यानंतर टिळकवाडी-अनगोळ परिसरात त्यांच्या वतीने आनंद शोभायात्रा काढून जल्लोष करण्यात आला.

प्रसाद वंटमुरी हे गेल्या अनेक वर्षांपासून रोटरी क्लबशी जोडलेले असून सामाजिक व जनसेवेच्या कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या या यशाबद्दल रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह रोटेरियन सदस्यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी रोटेरियन सदस्यांनी गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना लाभदायी ठरणारी कलाश्रीची बक्षीस योजना राबवल्याबद्दल प्रकाश डोळेकर यांचे कौतुक केले. भविष्यातही या योजनेला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रकाश डोळेकर यांनी कार विजेते प्रसाद वंटमुरी यांचा गौरव करून त्यांना कारच्या चाव्या प्रदान केल्या.

यावेळी रवींद्र हुंदलेवाडकर, संजय मेलगे, रोटेरियन अरुण पाटील, रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिटडाऊनचे अध्यक्ष आनंद गुमसते, रोटेरियन सतीश नाईक (बेमको मॅनेजर), श्रीहरी पवार, ओमकार कुरणे, रमेश माळवी, महेश कामते, विष्णू डोळेकर (स्कीम चेअरमन), संजीव पाटील, गणेश (गजानन) शिंदोळकर यांच्यासह रोटेरियन व कलाश्री उद्योग समूहाचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *