Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love

 

९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त

बेळगाव : शहरातील अवैध मटका जुगाराविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, शहापूर आणि माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र ठिकाणी छापे टाकून चौघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ९ हजार ८०० रुपये रोख रक्कम आणि मटका जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

शहापूर पोलिसांनी खासबाग परिसरातील मरगम्मा गल्ली येथे छापा टाकून संतोष नारायण कणुकाळे (वय ५३) आणि शुभम संतोष कणुकाळे यांना ताब्यात घेतले. हे दोघे सार्वजनिक ठिकाणी आकड्यांवर आधारित मटका जुगाराच्या पैजा स्वीकारत असल्याचे आढळले. त्यांच्याकडून २ हजार ३८० रुपये रोख आणि जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. जुगारातून जमा होणारी रक्कम कामत गल्ली येथील गजानन गराडे याच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, माळमारुती पोलिसांनी यमनापूर येथील कोल्हापूर हॉटेलजवळ कारवाई करून होळेप्पा शंकर गस्ती (वय ३२, रा. यमनापूर) आणि अर्जुन परशुराम कोळी (रा. पाटील गल्ली, कंग्राळी) यांना अटक केली. त्यांच्याकडून ७ हजार ४२० रुपये रोख आणि मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.

दोन्ही प्रकरणांत कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापतींकडून आढावा

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथे २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *