Sunday , November 22 2026
Breaking News

कर्नाटकात लवकरच १७ हजार शिक्षकांची मेगा भरती प्रक्रिया सुरु करणार : शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा

Spread the love

शिवमोग्गा : कर्नाटक राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, राज्यभरात सुमारे १७ हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली.

शिवमोग्गा जिल्ह्यातील सोराब विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी ही भरती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, समाजकल्याण व आदिवासी कल्याण विभाग आणि तलवाट ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या निवासी शाळेच्या अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे मंत्री म्हणाले.

प्रत्येकाला मोफत शिक्षण मिळावे आणि ग्रामीण भागातील मुलांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

ता.पं., जि.पं. मतदारसंघांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज

Spread the love    २९०० हून अधिक हरकतींची छाननी पूर्ण; मंत्री ईश्वर खांड्रे यांची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *