Sunday , November 22 2026
Breaking News

सीमाप्रश्नी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना पुणे विभाग समितीचे निवेदन

Spread the love

 

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा – मुंढवा गाव शाखा लोकार्पण सोहळ्याला युवा सेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती, पुणे विभाग यांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीमाप्रश्न, बेळगावमधील सध्याची परिस्थिती आणि मराठी भाषिक जनतेवरील दडपशाही या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही प्रलंबित असून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. केंद्र व राज्य सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी.

बेळगावमध्ये मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. मराठी पाट्या, मराठी शाळा, मराठी कार्यक्रमांवर निर्बंध लादले जात आहेत,त्याचबरोबर मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर, समितीच्या पदाधिकाऱ्यांवर लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यासाठी आंदोलन केल्यास खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.

कर्नाटक सरकारकडून राजकीय व शासकीय हुकूमशाही राबवली जात असून महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना व कार्यकर्त्यांना बेळगावात प्रवेशबंदी केली जात आहे. सीमाभागात कन्नड सक्ती केली जात असून मराठी भाषिक जनतेवर कन्नड भाषा लादण्याचा प्रयत्न सुरू असून, मराठी अस्मिता जपणाऱ्या जनतेला सातत्याने दडपशाहीला सामोरे जावे लागत आहे. ही दडपशाही थांबवून मराठी जनतेला न्याय मिळावा,आशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्वतः सेल्फी घेत निवेदन स्वीकारले आणि या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे व सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी शिवसेना (उबाठा) विभाग प्रमुख चंदन साळुंखे, गणपती पाटील, विश्वानाथ पाखरे, वैराळ सुळकर, सातेरी, पाटील, मारुती पाटील, गंगाराम वीर, अर्जुन वीर, शिवसेनेचे पदाधिकारी, व समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या ‘संध्या किरण सेवा केंद्रा’च्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *