Saturday , October 24 2026
Breaking News

रामतीर्थ नगरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रारंभ; २५ लाखांचा निधी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक ४६ मधील रामतीर्थ नगरातील सप्तगिरी वसाहतीत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. अंदाजे २५ लाख रुपये खर्चाच्या या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सप्तगिरी वसाहतीतील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होत होते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वसाहतीतील दळणवळण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

स्थानिक नागरिकांची अनेक दिवसांची मागणी लक्षात घेऊन आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी तातडीने पुढाकार घेतल्याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. तसेच आमदारांची सहज उपलब्धता, नागरिकांच्या समस्यांबाबतची आस्था आणि विकासकामांतील तत्परतेचे कौतुक केले.

यावेळी युवा नेते अमान सेठ, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सहायक कार्यकारी अभियंता बी. एस. केदार, समाजसेवक ताहिर सय्यद, बसवराज कोत्रशेट्टी, सरोजिनी शिंदे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

उत्तर मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य

बेळगाव उत्तर मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत असून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आवश्यक विकासकामे हाती घेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी यावेळी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Spread the love  बेळगाव : नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बेळगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *