


पुणे : महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि भागवत कुटुंबीयांच्या वतीने उदयोन्मुख गायिका व नाट्यकर्मी अनुष्का आपटे हिला २०२६ सालचा सई भागवत स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील श्रीराम लागू रंग अवकाश येथे २३ ऑक्टोबर रोजी आयोजित समारंभात ज्येष्ठ नाट्यकर्मी चंद्रकांत काळे यांच्या हस्ते अनुष्का आपटे हिला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. मोहन आगाशे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रसिद्ध सिने समीक्षक समर नखाते यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये रोख आणि मानपत्र असे आहे. गायन व नाट्य क्षेत्रात उदयोन्मुख कलाकार म्हणून कार्यरत असलेल्या अनुष्का आपटे हिच्या कलात्मक योगदानाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta