


निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुरली येथील विद्यालयातील सिद्धेश्वर सन १९५३ ते १९७५ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (ता.२५) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. अशोकराव भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात श ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ व गोवा येथील चौगुले कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य विनायकराव रामचंद्र शिरगुरकर यांचे ‘बदलत्या कुर्ली पंचक्रोशीसाठी शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
विद्यालयात शिक्षण घेतलेल्या जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणणे, शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणे आणि विद्यालयाशी असलेले ऋणानुबंध दृढ करणे हा या स्नेहमेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यां तर्फे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीतर्फे मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta