Friday , October 23 2026
Breaking News

पात्र, गरजू लाभार्थींना तात्काळ घरकुल वितरण करा

Spread the love

 

चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे; काँग्रेस कार्यालयात बैठक

निपाणी (वार्ता) : राजीव गांधी हाउसिंग बोर्डातर्फे सामान्य नागरिकांना घरकुल योजना मंजूर झाली आहे. ज्यांनी रक्कम भरली आहे त्यांची नावे यादीत समाविष्ट केली आहेत. त्याचे पुनरसर्वेक्षण करून गरीब आणि कर्ज लाभार्थींना तात्काळ या घरांचे वाटप करून हक्क पत्र देण्याची मागणी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले आहे. येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे म्हणाले, सुरुवातीपासूनच ही निवड प्रक्रिया निर्दोष आहे त्याच सुधारणा करून पात्र कुटुंबाची नावे घालण्याचा आग्रह धरला होता मात्र लोकप्रतिनिधींच्या हेकेखोरपणामुळे केवळ ६०० लाभार्थ्यांच्या नावांची यादी तयार केली. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा गरिबांची नावे घालण्याचा आग्रह धरला. योग्य लाभार्थ्यांना जात-पात, धर्म न मानता घरांचे वाटप झाले पाहिजे. याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी नगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना केल्या आहेत.
अद्यापही अनेक योग्य लाभार्थ्यांची नावे अपात्र यादीत असतील, किंवा कागदपत्रे अपूर्ण असणाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयात संपर्क साधावे. तात्काळ घरांचे वाटप न केल्यास पुढील परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा चिंगळे यांनी दिला आहे.
यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, सुजय पाटील, विजय शेटके, किरण कोकरे, दीपक सावंत, श्रीनिवास संकपाळ, संदीप चावरेकर, लोकेश घस्ते, शामराव पुंडे, संजय कांबळे, झाकीर कादरी, युवराज पोळ, वर्षा चव्हाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव अरिहंत सौहार्द संस्थेच्या जयसिंगपूर शाखेचा वर्धापन दिन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री.अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बोरगाव (मल्टिस्टेट), …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *