


निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री.अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बोरगाव (मल्टिस्टेट), जयसिंगपूर शाखेचा वर्धापनदिन मान्यवरांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी पार पडला.अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील,शिरोळचे आमदार माजी मंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी महालक्ष्मी व श्री सरस्वती यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन जयसिंगपूर येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष गौतम झेले दापत्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे संचालक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकाररत्न उत्तम पाटील, अभिनंदन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अभिनंदन पाटील यांनी, ग्राहकांचा विश्वास, सभासदांचे सहकार्य आणि हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटीने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. संस्थेने भविष्यातही ग्राहकांना अधिक सक्षम व दर्जेदार सेवा देत प्रगतीची नवी शिखरे गाठण्याचा मानस व्यक्त केला. आजी-माजी नगरसेवक, डॉक्टर, उद्योगपती, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, संस्थेचे संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta