Friday , October 23 2026
Breaking News

बेळगावात ३१ ऑक्टोबरला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; बेळगाव सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पारितोषिके

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि विश्व भारत सेवा समिती, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय, शहापूर, बेळगाव येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेची विभागणी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांमध्ये करण्यात आली आहे:
गट व विषय:
* प्राथमिक गट (इयत्ता ५ वी ते ७ वी):
१. मातृभाषेतील शिक्षण: काळाची गरज
२. माझे बालपण माझे कुटुंब
३. माझा भारत आणि माझी जबाबदारी
४. प्रदूषण मुक्त भारत
* माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी):
१. माझी मातृभाषा : २१ व्या शतकातील वाटचाल
२. आजचा तरुण आणि सोशल मीडियाचा विळखा
३. बदलाचे वारे आणि जेन झी (Gen Z)
४. लोकशाही आहे कुठे? एक विचार मंथन
पारितोषिके:
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे:
* प्राथमिक गट: प्रथम क्रमांक ₹१,५००, द्वितीय क्रमांक ₹१,०००, तृतीय क्रमांक ₹७५० आणि उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह.
* माध्यमिक गट: प्रथम क्रमांक ₹२,०००, द्वितीय क्रमांक ₹१,५००, तृतीय क्रमांक ₹१,००० आणि उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह.
* प्रशस्तीपत्र: सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र दिले जाईल.
महत्त्वाच्या नियम व अटी:
* स्पर्धकांनी दिलेल्या विषयांपैकी एकाच विषयावर सादरीकरण करणे आवश्यक आहे.
* राजकीय, धार्मिक किंवा जातीय भावना दुखावणारे वक्तव्य व घोषणाबाजी करण्यास सक्त मनाई आहे.
* स्पर्धेच्या वेळी शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणणे अनिवार्य आहे.
* स्पर्धेनंतर त्याच दिवशी बक्षीस वितरण करण्यात येईल.
* परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहिती व संपर्कासाठी:
* प्रकाश नंदिहळी: 9880552279
* मयूर नागेनहट्टी: 9663654577
सीमा भागातील विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *