Friday , October 23 2026
Breaking News

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या बदलीची शक्यता?; भावनिक भाषणामुळे तर्कवितर्कांना उधाण

Spread the love

 

बेळगाव : गेल्या अडीच वर्षांपासून बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आयएएस अधिकारी मोहम्मद रोशन यांच्या बदलीची वेळ जवळ आली आहे का, असा प्रश्न सध्या सार्वजनिक वर्तुळात उपस्थित होत आहे. एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भावनिक भाषणामुळे त्यांच्या संभाव्य बदलीबाबत चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणातील विधानांची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

“मी इथे असो किंवा नसो, हे नाते कायम स्मरणात ठेवेन,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. तसेच, योग्य वेळ आल्यावर बदलीसाठी सज्ज राहावे लागते आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.

त्यांच्या या विधानांमुळे बदलीचे संकेत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मोहम्मद रोशन यांच्या बदलीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने त्यांच्या पुढील नियुक्तीबाबतची उत्सुकता कायम आहे.

About Belgaum Varta

Check Also

अनिल गुरुनाथ आंबरोळे यांची भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या राष्ट्रीय आयोजन सचिवपदी नियुक्ती

Spread the love  बेळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद यश; जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंना मिळणार राष्ट्रीय स्तरावर संधी निर्माण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *