Friday , October 23 2026
Breaking News

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, शिवाय चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा सामाविष्ठ करावीत, ही मागणी करीत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध केला.

चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले,
‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी आणि मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा. घटनेने दिलेला अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. भारतीय संविधानाला कमकुवत बनविण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करीत आहे. त्यांचा हा डाव कार्यकर्त्यांनी हाणून पाडण्याचे आवाहन केले.
येथील काँग्रेस कार्यालयापासून विविध प्रकारचे फलक हातात घेऊन घोषणा देत कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालय गाठले. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष रोहन साळवे, राजेश कदम, निकु पाटील, सुजय पाटील, बसवराज पाटील, विजय शेटके, ॲड. संजय चव्हाण, लोकेश घस्ते, किरण कोकरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कक्केरी यात्रेसाठी आलेल्या १८ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू

Spread the love  हुलिकेरी येथील इंदिरम्मा तलावातील घटना; अळणावर पोलिसांत नोंद बेळगाव : जत्रेचा उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *