Friday , October 23 2026
Breaking News

कक्केरी यात्रेसाठी आलेल्या १८ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू

Spread the love

 

हुलिकेरी येथील इंदिरम्मा तलावातील घटना; अळणावर पोलिसांत नोंद

बेळगाव : जत्रेचा उत्साह आणि नातेवाईकांच्या भेटीचा आनंद सुरू असतानाच एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कक्केरी येथील श्री बिष्टादेवी यात्रेनिमित्त नातेवाईकांकडे आलेल्या १८ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२१ ऑक्टोबर) हुलिकेरी गावातील इंदिरम्मा तलावात घडली.

गणेश केदार्जी पुजारी (वय १८, रा. तडकोड, ता. धारवाड) असे मृत युवकाचे नाव आहे. कक्केरी येथील श्री बिष्टादेवी यात्रेनिमित्त गणेश आपल्या नातेवाईकांकडे हुलिकेरी येथे आला होता. यावेळी तो कुटुंबीयांसमवेत तलाव परिसरात गेला असता पोहण्यासाठी पाण्यात उतरला.

मात्र, तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात्रेच्या निमित्ताने आनंदाने एकत्र आलेल्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा आघात झाला असून, हुलिकेरी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी अळणावर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *