Friday , October 23 2026
Breaking News

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध पूजनासह सीमोल्लंघन पार पडला. यावेळी एकमेकांनी आपट्याची पाने देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. सहकाररत्न उत्तम पाटील व पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांच्या हस्ते दसरा व आयुध पूजन सोहळा पार पडला. दसरा हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय मिळवण्याचा संदेश देतो. या मंगलमय पर्वानिमित्त शस्त्रपूजनासह आयुध पूजनाला विशेष महत्त्व असून, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन उत्तम पाटील यांनी केले. यावेळी बोरगांव पट्टन पंचायतचे नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध सहकारी संस्था व संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कक्केरी यात्रेसाठी आलेल्या १८ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू

Spread the love  हुलिकेरी येथील इंदिरम्मा तलावातील घटना; अळणावर पोलिसांत नोंद बेळगाव : जत्रेचा उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *