Friday , October 23 2026
Breaking News

शिवमोग्गा दसरा मिरवणुकीत मोठा अनर्थ! चांदीची अंबारी घेऊन हत्ती सैरावैरा धावला; अंबारीचे नुकसान

Spread the love

 

 

शिवमोग्गा : कर्नाटकातील शिवमोग्गा येथील दसरा जंबूसवारी मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. देवीची चांदीची अंबारी घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेला ‘सोमण्णा’ नामक हत्ती अचानक बिथरून सैरावैरा धावू लागला. या गोंधळात हत्तीच्या पाठीवरील अंबारी खाली पडून तिचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली.

कर्नाटकातील म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा दसरा म्हणून शिवमोग्गा दसरा प्रसिद्ध आहे. यंदा प्रथमच ‘सोमण्णा’ हत्ती चांदीची अंबारी घेऊन जंबूसवारीत सहभागी झाला होता. मात्र, मिरवणुकीदरम्यान तो अचानक बिथरल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

हत्तीच्या धावपळीत काही दुचाकी आणि कारचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी माहुतांना मोठी कसरत करावी लागली.

या अनपेक्षित घटनेमुळे प्रशासनाने दसरा जंबूसवारी मिरवणूक अर्ध्यावरच थांबवली. ऐन उत्सवात घडलेल्या या प्रकारामुळे भाविक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी आंदोलनाचा प्रल्हाद जोशींना धसका; हुबळीतील निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त

Spread the love  हुबळी : ऊसाला योग्य दर, किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ आणि अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *