Friday , October 23 2026
Breaking News

वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक! प्रति युनिट ४० ते ५० पैशांनी वाढण्याची शक्यता

Spread the love

 

बंगळूर : कर्नाटकातील वीज ग्राहकांना लवकरच दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या बिलिंग कालावधीत वीजदरात प्रति युनिट ४० ते ५० पैशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या दरवाढीला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही.

राज्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यक वीजपुरवठा करण्यासाठी राज्याबाहेरील वीज उत्पादकांकडून तसेच खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली. त्यामुळे वीज वितरण कंपन्यांवरील आर्थिक भार वाढला आहे.

दक्षिण भारतातील वाढते तापमान आणि अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली होती. परिणामी, सप्टेंबर महिन्यात कर्नाटकातील विजेची मागणी विक्रमी २० हजार मेगावॅटपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. या वाढीव खर्चाची भरपाई करण्यासाठी ‘इंधन व वीज खरेदी खर्च समायोजन’ नियमांतर्गत दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

गृहज्योती योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा?

राज्य सरकारच्या गृहज्योती योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि निर्धारित मर्यादेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या संभाव्य दरवाढीचा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, योजनेच्या कक्षेबाहेरील ग्राहक, निर्धारित मोफत वीज मर्यादेपेक्षा अधिक वापर करणारे ग्राहक तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.

दरम्यान, प्रस्तावित दरवाढ लागू करण्यासाठी कर्नाटक वीज नियामक आयोगाची अंतिम मंजुरी आवश्यक आहे. आयोगाच्या निर्णयानंतरच वीजदरवाढीबाबतचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी आंदोलनाचा प्रल्हाद जोशींना धसका; हुबळीतील निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त

Spread the love  हुबळी : ऊसाला योग्य दर, किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ आणि अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *