Sunday , July 26 2026
Breaking News

चंदगड

तेऊरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी मोहन पाटील यांची निवड

  चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार चंदगड (प्रतिनिधी) : तेऊरवाडी येथील तेऊरवाडी विद्यालय तेऊरवाडीच्या मुख्याध्यापकपदी ज्येष्ठ शिक्षक, चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक मा. श्री. मोहन पाटील यांची पदोन्नतीने निवड झाल्याबद्दल त्यांचा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी संघाच्या …

Read More »

खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करुन कारवाई करावी; चंदगड तालुका पत्रकार संघाची मागणी

  चंदगड : पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात सोमवारी सकाळी चंदगड तहसीलदार …

Read More »

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे गूढ अखेर उलगडले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत शिताफीने तपास करत कर्नाटकातील तिघा आरोपींना अटक केली आहे. मयत महिलेची ओळखही सुरुवातीला अज्ञात असताना आणि तपासासाठी फारसे धागेदोरे नसतानाही पोलिसांनी केलेल्या तांत्रिक व बारकाईच्या तपासामुळे हा गुन्हा …

Read More »

शिनोळीत पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरा

  चंदगड (प्रतिनिधी) : शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतना प्रकल्पांतर्गत शिनोळी बु. येथे रामनवमी पारायण सोहळ्यानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पालक तसेच आजी-आजोबा यांचा विधीवत पाद्यपूजन सोहळा भावनिक आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे पालकांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जपणूक यांचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक आप्पाराव …

Read More »

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

  नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या तिन्ही तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून माजी आमदार कै.तुकाराम कृष्णाजी कोलेकर यांच्या आशीर्वादाने विद्येचे माहेरघर समजले जाते, येथे आसपासच्या गावाबरोबरच सीमा भागातील कर्नाटकमधून दड्डी- कोट, बेळंकी, मोदगे येथील बरेचसे विद्यार्थी नेसरी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यांना नेसरी वाहतूक …

Read More »

पत्रकार दिनी कु. अवनी अर्जुन जाधवचा “कला रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित

  ठाणे : सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि करण्यासाठी आपल्या हातांना बळ देऊ पाहणारया पत्रकार, साहित्यिक, कलावंत, खेळाडू यांच्या अनेक पत्रकार संघ, संस्था, संघटना, महापालिका आणि …

Read More »

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील

  चंदगड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदासाठी संतोष सावंत भोसले (संपादक -चंदगड टाईम्स) तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील (संपादक -सत्यघटना) यांची सन २०२६-२०२७ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण व पत्रकार दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमानंतर …

Read More »

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत दिला जाणारा “राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजभूषण तेज रत्न पुरस्कार 2025” ने ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री राजाराम जाधव यांना सन्मानित करण्यात आले. राजाराम जाधव स्वतः दिव्यांग असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात निडरपणे असत्या विरोधात आवाज उठवून अनेक भ्रष्ट कारभार उघडकीस …

Read More »

आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना महिलेच्या नावे अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आता या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी हा चंदगडमधीलच रहिवासी असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षभरापासून …

Read More »

चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर

  चंदगड : चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर मजरे कर्वे, (ता.चंदगड जि.कोल्हापूर) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश बांदिवडेकर उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करून,संस्थेच्या पुढील सन 2025 ते 2030 या कालावधी करिता नूतन कार्यकारिणी मंडळाची बहुमताने व …

Read More »