Friday , August 21 2026
Breaking News

खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करुन कारवाई करावी; चंदगड तालुका पत्रकार संघाची मागणी

Spread the love

 

चंदगड : पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात सोमवारी सकाळी चंदगड तहसीलदार कार्यालय तसेच चंदगड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सावंत-भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष राहुल पाटील, सचिव चेतन शेरेगार, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील व संजय पाटील, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष संपत पाटील तसेच सदस्य ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, मारुती पाथरवट, रोहित धुपदाळे, संदीप कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते.

तहसीलदार प्रकाश जोशिलकर यांनी तहसील कार्यालयात, तर पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी चंदगड पोलीस ठाण्यात निवेदन स्वीकारले.

पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरणे, शिवीगाळ करणे व धमकी देणे हा लोकशाहीतील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचे नमूद करत, संबंधित प्रकरणाची चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

Spread the love  नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *