Sunday , July 26 2026
Breaking News

तेऊरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी मोहन पाटील यांची निवड

Spread the love

 

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार

चंदगड (प्रतिनिधी) : तेऊरवाडी येथील तेऊरवाडी विद्यालय तेऊरवाडीच्या मुख्याध्यापकपदी ज्येष्ठ शिक्षक, चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक मा. श्री. मोहन पाटील यांची पदोन्नतीने निवड झाल्याबद्दल त्यांचा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला.

यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तेऊरवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान केला. आपल्या अभ्यासू वृत्ती, नेतृत्वगुण, मराठी विषयातील प्रभुत्व आणि शिक्षक संघटनेतील योगदानामुळे मोहन पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या मुख्याध्यापकपदी झालेल्या निवडीबद्दल शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

या सत्कारप्रसंगी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे संजय साबळे, रवींद्र पाटील, महादेव शिवणगेकर, मुख्याध्यापक आनंद पाटील, बी. एन. पाटील, एच. आर. पाऊसकर व एस. पी. पाटील उपस्थित होते.

यावेळी महादेव शिवणगेकर यांनी मोहन पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना मोहन पाटील यांनी सर्व सहकारी शिक्षक, मराठी अध्यापक संघ आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले. नव्या जबाबदारीत विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्तावृद्धी आणि विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मोहन पाटील यांच्या या पदोन्नतीबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

Spread the love  नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *