Friday , November 6 2026
Breaking News

अनाथाश्रमातील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप

Spread the love

 

 

बेळगाव : दिवाळीच्या मंगलमय सणानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सदस्यांनी कियान अनाथाश्रमाला भेट देऊन तेथील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप केले. अनाथाश्रमातील प्रत्येक मुलाला नवीन कपडे देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्याचा या उपक्रमामागील उद्देश होता.
दिवाळी हा आशा, एकोपा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा संदेश देणारा सण आहे. प्रत्येक मुलालाही सणाचा आनंद, आपुलकी आणि सन्मान अनुभवता यावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा पाटील यांनी सर्वाधिक कपड्यांचे योगदान दिले. तसेच रोटेरियन रक्षा उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन व समन्वय साधून हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी सांगितले की, या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या क्लबच्या सर्व सदस्यांचे, हितचिंतकांचे आणि देणगीदारांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देण्यासाठी तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यापुढेही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी फलक हटविणाऱ्यांवर कारवाई करा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

Spread the love  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम; मोर्चा काढण्याचा इशारा बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *