


बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या साहसी कसरती, विनोदी कार्यक्रम आणि मनोरंजन कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आता सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर सुरु राहणार आहे.
या सर्कसमध्ये डबल साडी ॲक्रोबॅट, कॉमिक चेअर ॲक्रोबॅट, बास्केटबॉल शो, कँडल बॅलन्स, रोप जगलिंग आणि रोलर ॲक्ट यांसारखे अनेक विशेष स्टंट शो सादर केले. यासोबतच, मणिपूर, आफ्रिका आणि टांझानिया येथील कलाकारांनी आपली अनोखी कला आणि स्टंट कौशल्ये सादर करून या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्पर्श दिला आहे.
आयोजकांनी सांगितले की, सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे आणि संपूर्ण कुटुंब तो पाहू शकते.
सर्कसचे मुख्य आकर्षण असलेल्या प्राण्यांच्या खेळांवर बंदी घातल्यानंतर, सर्कसला आणखी लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने, जंबो सर्कस आफ्रिका, टांझानिया आणि मणिपूरसह विविध देशांतील कलाकारांचा वापर करून सर्कसची लोकप्रियता वाढवण्यासाठी आघाडीवर आहे, असे जंबो सर्कसचे व्यवस्थापक टायटस वर्गीस यांनी सांगितले.
जंबो सर्कसचा पहिला कार्यक्रम 2 आॕक्टोबर १९७७ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी बिहारमधील धनापूर येथे एम. व्ही. शंकरन यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. तेव्हापासून, जंबो सर्कसने देश-विदेशात हजारो कार्यक्रम सादर करून सर्कसची कला जिवंत ठेवली आहे. आज, एम. व्ही. शंकर यांचे पुत्र अजय शंकर आणि अशोक शंकर यांनी जंबो सर्कस पुढे चालवून आपल्या वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे.
बेळगांवच्या नागरिकांना अस्सल मनोरंजन देण्याच्या उद्देशाने, जंबो सर्कसने बेळगांव मधील सीपीएड मैदानावर आपल्या कार्यक्रमांना सुरुवात केली आणि सर्कसप्रेमींची मने जिंकण्यात ती यशस्वी झाली आहे.
टायटस वर्गीस म्हणाले की, बेळगांव मधील सीपीएड मैदानावर कार्यक्रम सादर करणाऱ्या जंबो सर्कसचे विशेष आकर्षण म्हणजे आफ्रिका, टांझानिया, मणिपूर आणि भारतातील विविध भागांतील नामवंत कलाकारांनी सादर केलेले विविध आणि रोमांचक स्टंट कार्यक्रम.
ते म्हणाले की, सर्कस दररोज दुपारी १ वाजता, दुपारी ४ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता होईल.
जंबो सर्कसमध्ये टांझानिया, इथिओपिया, मणिपूर आणि परदेशासह विविध देशांतील ६० कलाकार आहेत, जे विविध साहसी कार्यक्रम सादर करून सर्कसप्रेमींचे मनोरंजन करतात, असे टायटस वर्गीस म्हणाले.

Belgaum Varta Belgaum Varta