


खडेबाजार पोलिसांची कारवाई
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना वर्षभरापूर्वी समिती कार्यालयाबाहेर घडलेल्या घटनेप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे समजते.
खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून, जातिवाचक गुन्ह्याच्या आरोपावरून दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
या कारवाईमुळे बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील नेमकी घटना, दाखल गुन्ह्याचे स्वरूप आणि पोलिसांकडून अधिकृतपणे देण्यात येणारी माहिती याबाबत सविस्तर तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

Belgaum Varta Belgaum Varta